शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी -बेकादेशीररित्या स्वतःजवळ रॅम्बो सुरा बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

आकाश बबन लांडगे (वय-20 रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस शिपाई किरण वसंत खेडकर यांनी फिर्याद दिली.

निवडणुकांमुळे पोलीस सध्या सर्व आरोपींवर व अवैध धंद्यावर आपली नजर ठेऊन आहेत. त्यामुळे अवैध शस्त्र बाळगणे, त्याची विक्री करणे अशा गोष्टींवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तरुणावर आर्म ऍक्‍ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.