फोनवरून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

पिंपरी – फोन करुन 28 वर्षीय तरुणीला अश्‍लिल बोलणाऱ्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर खंडाळे (वय-31 रा. सांगवी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शनिवारी (दि.20) सकाळी पीडित तरुणीला फोन करत अश्‍लिल बोलण्यास सुरुवात केली. यावरून तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तिने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.