Chhota Rajan । दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा जिंवत असल्याची मोठी माहिती समोर आलीय. आता छोटा राजन हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याचे अलीकडेच फोटो समोर आलेत. 2015 मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी परदेशात पकडले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. 2015 नंतर छोटा राजनचा हा पहिलाच फोटो आहे.
दरम्यान, जे चित्र समोर आले आहे ते 2020 सालचे आहे, जेव्हा मीडियामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. छोटा राजनच्या समोर आलेल्या दोन फोटोंपैकी एक चित्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्लीचे आहे, तर दुसरे चित्र ॲम्ब्युलन्स व्हॅनचे आहे. सध्या छोटा राजन दिल्लीतील तिहार येथील तुरुंग क्रमांक 2 मध्ये बंद आहे, जो अत्यंत उच्च सुरक्षा तुरुंग आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील तुरुंग क्रमांक २ मध्ये आहेत.
छोटा राजन दाऊद टोळीचा निशाणा Chhota Rajan ।
एक काळ असा होता जेव्हा छोटा राजन हा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जात होता. त्याने दोन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा दिला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला. छोटा राजन आणि दाऊद यांच्यातील वैरामुळे मुंबई, दुबई आणि नेपाळमध्ये अनेकांची हत्या करण्यात आली होती. दाऊदचा जवळचा मित्र छोटा शकील अजूनही छोटा राजनवर हल्ला करण्याची योजना आखत आहे.
दाऊद इब्राहिमचा खास गुंड छोटा शकील याने छोटा राजनला धमकी दिली होती. ‘छोटा राजनला वाटतं की जोपर्यंत तो तिहार तुरुंगात आहे तोपर्यंत त्याचा जीव सुरक्षित आहे. पण त्याचा मृत्यू तिहारमध्येच होईल. कारण आम्ही त्याला तिहार तुरुंगातच मारणार आहोत. डी कंपनी आता छोटा राजनला शत्रूच्या श्रेणीत ठेवणार नाही. तो मेलेला साप आहे.
छोटा राजनची अटक Chhota Rajan ।
छोटा राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली शहरातून अटक करण्यात आली होती. 25 ऑक्टोबर 2015 रोजी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांना एक भारतीय वंशाचा नागरिक बाली येथे जात असल्याची बातमी मिळाली. फेडरल पोलिसांनी तातडीने इंटरपोलच्या माध्यमातून बाली इमिग्रेशन विभागाला माहिती दिली आणि छोटा राजनला बाली येथे पोहोचताच विमानतळावर अटक करण्यात आली.