सातारा – भुईंज (ता. वाई) येथील गोळीबार प्रकरणातील संशयिताला चाळीस हजाराची खंडणी मागणारा वाईचा तत्कालीन डीवायएसपी व पुण्याचा सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे याच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुंबरे हा सध्या पुणे पोलीस दलात एसीपी या पदावर काम करत आहे. मात्र, त्याला पुणे पोलीस आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याने सध्या तो रिकामाचा असतो. त्यामुळे तो चार दिवसांपूर्वी भुईंज येथे आला होता. त्याने एका गोळीबार प्रकरणातील संशयिताच्या मित्रांना
गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 40 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर सदर रक्कम घेऊन हुंबरे पुण्याला गेला होता.
मात्र, याची माहिती सातारा जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठांना मिळाल्यानंतर हुंबरे याला सातार्यार पाचारण करण्यात आले होते. सातार्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज यांच्यासमोर पाटील हुंबरेची चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंबरे याचा सातारा जिल्ह्यातील कार्यकाळ हा वादग्रस्त राहीला असून मुंबईची ड्रग माफीया बेबी पाटणकर प्रकरणात ही हुंबरे यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर हुंबरे अधिक चर्चेत आला होता.