नगर – जिल्ह्यात आज 475 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 712 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 94.10 टक्के इतके झाले आहे. त्यामुळे नगरमध्ये करोनाने रुग्णालयातून काढता पाय घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 385 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2312 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 93, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 110 आणि अँटिजेन चाचणीत 182 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 41, अकोले 17, जामखेड 4, कर्जत 2, नगर ग्रामीण 1, नेवासे 12, पारनेर 4, राहुरी 3, संगमनेर 2, शेवगाव 3, श्रीरामपूर 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 110 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 38, अकोले 5, जामखेड 3, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 14, नेवासे 3, पारनेर 6, पाथर्डी 5, राहाता 13, राहुरी 7, संगमनेर 10, शेवगाव 3, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 182 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 12, अकोले 22, जामखेड 11, कर्जत 15, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 4, नेवासे 10, पारनेर 5, पाथर्डी 16, राहाता 13, राहुरी 2, संगमनेर 21, शेवगाव 23, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 13, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या : 49,712
उपचार सुरू असलेले रुग्ण : 2,312
आजपर्यंतचे मृत्यू : 803
एकूण रुग्णसंख्या : 52,827