पुणे जिल्हा: “बरे होऊन घरी जायचे आहे, काळजी घ्या’

जेजुरी- तुम्हाला लवकर बरे होऊन घरी जायचे आहे, त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी करोना रुग्णांना केले. मार्तंड देवसंस्थानच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या करोना केअर सेंटरला खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांनी भेट दिली. त्यावेळी खासदार सुळे यांनी दुरून करोना रुग्णांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

यावेळी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, तहसीलदार रुपाली सरनोबत, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त संदीप जगताप, विश्‍वस्त शिवराज झगडे, ऍड. अशोक संकपाळ, पंकज निकुडे, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, मुख्याधिकारी पूनम कदम आदींनी सेंटरची माहिती दिली.

दरम्यान, सुळे यांनी येथील परिचारीकांना बोलावून घेऊन त्यांच्याबरोबर संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेत कामाचे कौतुक केले. तर रेल्वे स्टेशन परिसरातील माजी नगरसेवक मेहबुब पानसरे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित रक्‍तदान शिबिराचे खासदार सुळे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सुमारे 100 जणांनी रक्‍तदान केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.