शिरूरमध्ये करोनाचा कहर; एकाच दिवशी 13 पाॅझिटिव्ह

शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहरात एकाच दिवशी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली असून यामध्ये एक डंबेनाला येथील व्यावसायिक व एक नामांकित डॉक्टर या दोघांचा समावेश आहे तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.

एकाच दिवशी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने शिरूर शहर पूर्णपणे हादरून गेले आहे. शिरूर शहरात आता रुग्ण संख्या 27 झाली असून शहरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसापासून गंभीर नसलेले शिरूरकर आता पूर्णपणे हादरून गेले आहेत. शिरूर शहरात कोरोनाची साखळी वाढत चालली असून आता ही साखळी तोडायची कशी हे मोठे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.

शिरूर शहरातील कुंभार आळी येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेली 6, तर एका नामांकित डॉक्टर व त्याचे नातेवाईक असे 4 , डंबेनाला येथील 1 व हुडको वसाहतीतील कोरोना बाधित 53 वर्षीय रुग्णाचा भाऊ, कामाठीपुरा येथील 1 असे मिळून एका दिवशी 13 रुग्ण आढळून आले आहेत.

शिरूर नगर परिषदेच्या वतीने या भागात जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरूर शहरात आज कोरोनाचा कहर झाला असून नागरिकांनी आता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये  आणि शासनाने दिलेल्या इतर नियमांचे पालन करणे असे आवाहन शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.