रांजणगाव गणपती(प्रतिनिधी) – पुण्यातील एका नामांकित हाॅस्पिटलमध्ये कोरोना पाँझिटिव्ह झालेल्या रुग्णाने बील कमी होण्यासाठी रांजणगावचा पत्ता सांगितल्याने ग्रामस्थांसह सर्व प्रशासकीय यंञणांची चांगलीच धावपळ उडाली होती. माञ संबंधित इसमास सरकारी हिसका दाखवताच आपण रांजणगाव चा खोटा पत्ता दिले असल्याचे सांगितल्याने रांजणगावकरांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे रांजणगाव कोरोना मुक्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रांजणगाव येथे एक करोना रुग्ण सापडला असल्याची माहिती देण्यात आली. संबधित नागरिकाशी संपर्क साधला असता तो विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना वेग-वेगळी माहिती देत असल्याने अधिकाऱ्याच्यांत संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. माञ संबधित इसमास सरकारी हिसका दाखवताच बील कमी होण्यासाठी आपण रांजणगावचा पत्ता सांगितला आहे असे सांगितले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1244144175925285/
पुण्यातील नामांकित रुग्णालयात मावशीला भेटण्यासाठी मुंबईहून आलो असता आईला ही ञास होऊ लागल्यावर वैद्यकीय तपासणी केली असता आईला कोरोनाची लागण झाली असल्याचे ऊघड झाले होते. नंतर संबंधित इसमाने ही तपासणी केली असता तो ही कोरोना पाँझिटिव्ह आला असता बील कमी करण्यासाठी रांजणगाव येथे वास्तव्य केले असल्याचा बनाव रचला. माञ प्रशासकीय यञंणेने तपास केला असता संबंधित रुग्ण खोटी माहिती देत असल्याचे प्रशासकिय यंञणेच्या लक्षात येताच त्याला सहकारी हिसका दाखवताच खरी माहिती दिल्याने रांजणगावकरांना दिलासा मिळाला व रांजणगाव कोरोना मुक्त असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.