बेल्हे(प्रतिनिधी ) – जुन्नर तालुक्यात अणे पठार भागावर अद्याप करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता; परंतु सोमवारी एक रुग्ण शिंदेवाडी जवळील वरुंडी येथे आढळला असल्याने अणे पठार भागावर करोनाने शिरकाव केला आहे.
तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी सोमवारी अणे पठार व बेल्हे या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या वेळी बेल्हे गावात करण्यात आलेल्या लॉक डाऊन शिथील करण्याची मागणी बेल्हे ग्रामपंचायत व नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, सर्वांनी सोशल डिस्टंन्सचे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.