भीमाशंकरला आल्यास गाडी जप्त करू; पोलिसांचा इशारा

मंचर (प्रतिनिधी)-श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्रावण महिन्यातील यात्रा या वर्षी पूर्ण बंदच आहे. तर पर्यटन व दर्शनही बंदच आहे करोनाच्या महामारीमुळे येथे कोणीही येऊ नये असे देवस्थान व प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु यातूनही जर कोणी पर्यटन व दर्शनासाठी आल्यास गाडी जप्त व गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले आहे.
दुसऱ्या श्रावण सोमवारीही भीमाशंकर कडक बंद होते. दर वर्षी श्रावणात रक्षाबंधन व सलग सुट्ट्यामध्ये लाखोच्या संख्याने भाविक येत असत पण कोरणा महामारीमुळे आज परिसरात शुुकशुकाट आहे. यातच सध्या भीमाशंकरला यात्रा काळात पहाटे पाच वाजता पहिली पुजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनाला खुले करण्यात येत असे. यंदा यात्रा नसली तरी नित्यनियमांनी पहिली पूजा नंतर 12ची नैवद्य पूजा, तीन वाजता दुपारची आरती व 7.30 वाजता सायंकाळची आरती ही नियमितप्रमाणे पुजारी चार पाच जणांत असे सुरू राहणार असल्याचे भीमाशंकरचे विश्वस्त मधुकर गवांदे व रत्नाकर कोडीलकर यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यापासून श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. श्रावण महिना 21 जुलैपासून सुुरु झाला आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी येथे येऊ नये. मंदिर बंद असून पर्यटनही बंद आहे. भीमाशंकर परिसरात दर्शनासाठी, पर्यटनासाठी कोणीही येऊ नये, डिंभे व पालखेवाडी येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. जर कोणी या भागात फिरताना आढळल्यास गाडी जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.