जामखेड (प्रतिनिधी) – दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातुन ताब्यात घेतलेले परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता जामखेड शहरात पसरले असल्याचे दिसते आहे.
बारा दिवसांपासून जामखेड येथिल काझी गल्लीतील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या १० परदेशी व ४ इतर राज्यातील अशा चौदा नागरिकांपैकी एक फ्रान्स व दुसरा आयव्हरी येथील होता. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दोन जणांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत चौदा लोकांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्यातील मुस्लीम समाजाची प्रार्थना स्थळे सील केले आहेत १४ पैकी .उर्वरित बारा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु या परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते.
परदेशी लोक संगमनेर, जामखेड, राहुरी, नेवासा, नगर शहरातील मुकुंदनगर भागातही राहून गेले आहेत. त्यामुळे जामखेड येथील ३१ जण त्यांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने या सर्वांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावले होते. त्यापैकीच जामखेड येथील तीन जणांना कोरणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी (३१ मार्च) त्यांचा अहवाल पुणे येथील लॅबकडून मिळाला. आता या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान जामखेड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत