मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, करोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्वप्रकारची सार्वजनिक स्थळं, आणि चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्व कलाकार घरात बसून आहेत.
View this post on Instagram
बॉलिवूडचा भाई ‘सलमान खान’ सुद्धा घरीच थांबला असून त्याने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो उत्तम स्केच बनवताना आपल्याला दिसतोय. अगदी काही मिनिटांमध्ये तो हे स्केच पुर्ण करतो. दोन महिलांच्या चेहऱ्याचे स्केच सलमानने काढलेले आहे.
दरम्यान, सलमानच्या या व्हिडिओवर आता चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सची बरसात सुरु केली आहे.