नवी दिल्ली – ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंच्या प्रकरणामध्ये काल एक नवीन वळण पाहायला मिळालं. अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी लैगिक छळाचा खोटा आरोप केल्याची कबुली एका वृत्तसंस्थेसमोर दिली आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला. हे सर्व आरोप मी रागाच्या भारत केल्याचे स्पष्टीकरण यावेळी कुस्तीपटूच्या वडिलांनी दिले. यानंतर आता ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महिला कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्यानंतर आता ब्रिजभूषण सिंह यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. १५ जूनपर्यंत या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाईल त्यामुळे आत्ता याबाबत काही बोलावे असं मला वाटत नाही असं ब्रिजभूषण एका वृत्तसंशेशी बोलताना म्हणाले.
सर्व प्रकरण न्यायालयासमोर असून १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. यानंतर आता आधी कोर्टात आरोपपत्र दाखल करू द्या. मला आता काही बोलण्याची गरज वाटत नाही असं ब्रिजभूषण म्हणाले आहेत.
#WATCH | Delhi | “All the matters are before the court. Govt has also given an assurance that the chargesheet will be filed by 15th June. Let the chargesheet be filed. I don’t think I should say anything now,” says Brij Bhushan Sharan Singh when asked about media reports claiming… pic.twitter.com/Gj1c7Ef344
— ANI (@ANI) June 9, 2023
महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया 5 जून रोजी रेल्वेतील ओएसडीच्या नोकरीवर परतल्या. यानंतर त्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या बैठकीनंतर पैलवानांनी हे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित केले.