Brijbhushan Sharan Singh : आपण कुस्तीतून केव्हाच निवृत्ती घेतली असून आता आपले संपूर्ण लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीवर आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्यात आली होती आणि अशी लोकनियुक्त नवी कार्यकारिणी निलंबित करण्यातून वेगळाच पायंडा पडू शकतो, असे प्रतिपादन भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांनी केले आहे.
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाच्या निलंबनाबाबत ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया आली आहे. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरुन कुस्तीपटूंनी यावर्षी जानेवारीत ब्रिजभूषण यांच्याविरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
#WATCH | After the Union Sports Ministry suspends the newly elected body of the Wrestling Federation of India, former WFI chief Brij Bhushan Sharan Singh says, “The elections were held in a democratic way on the direction of the Supreme Court and the body was formed…Now it’s… pic.twitter.com/gTJDgptO8R
— ANI (@ANI) December 24, 2023
ब्रिजभूषण सिंग यांना हटवल्यानंतर निवडणुका झाल्या. २१ डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत त्यांचे जवळचे सहकारी संजय सिंह यांनी विजय मिळवला. इतकेच नाही तर बहुतांश पदांवर केवळ ब्रिजभूषण यांचे सहकारी निवडून आले. यानंतर ऑलिम्पियन साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. तर बजरंग पुनियाने पद्मश्री परत केले. वाढत्या वादानंतर सरकारने कुस्ती महासंघालाच निलंबित केले.
मात्र, नवीन अध्यक्षांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. नवनिर्वाचित मंडळाने कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेशी सूचना न देता अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याची घाईघाईने घोषणा केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाला निलंबित केले.
काळ माझ्या कामाचे मूल्यमापन करेल… ब्रिजभूषण
ब्रिजभूषण म्हणाले, आम्हाला खेळाचे वातावरण सुरू करायचे होते. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. वेळ वाया जाऊ नये म्हणून निवडणुका झाल्या. माजी अध्यक्ष म्हणून मी बैठकीला गेलो होते. १२ वर्षे कुस्तीसाठी काम केले. येणारा काळच माझ्या कामाचे मूल्यमापन करेल. माझा आता कुस्तीशी संबंध नाही. मी निवृत्त झालो आहे. माझे पूर्ण लक्ष लोकसभा निवडणुकीकडे आहे.