नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह बबलू यांना फोन करुन त्यांच्यासह ब्रिजभूषण शरण सिंहना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजयसिंह बबलू, रहिवासी कबीर नगर, दुर्गाकुंड, वाराणसी यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी भेलुपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजयसिंग बबलू यांनी पोलिसांना सांगितले की, १२ जानेवारीच्या रात्री त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून दोनदा कॉल आला. अनोळखी नंबर असल्याने त्याने कॉल रिसिव्ह केला नाही. १३ जानेवारी रोजी त्याच नंबरवरून पुन्हा कॉल येऊ लागले. तिसर्यांदा फोन आला आणि काय प्रकरण आहे ते विचारले.
फोन करणाऱ्याने कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावर संजय सिंह यांनी घाबरून फोन कट केला. मात्र त्या नंबरवरून सतत येणाऱ्या कॉलमुळे ते आणि त्याचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे.
याप्रकरणी संजयसिंग बबलू यांच्या फिर्यादीवरून भेलुपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अनुराग कुमार मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.