Brijbhushan Sharan Singh | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना आता उत्तर प्रदेशात उरलेल्या १२ जागांसाठी लोकांच्या नजरा भाजपच्या उमेदवारांकडे लागल्या आहेत. | Lok Sabha Election 2024
मात्र, कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या उमेदवारीसाठी हटवादीपणा सुरु केल्याने या १२ जागांसाठीच्या उमेदवारांची यादी गुंतागुंतीची बनत आहे. । Brijbhushan Sharan Singh | Lok Sabha Election 2024
भाजपच्या उर्वरित सर्व उमेदवारांची यादी रामनवमीनंतरच जाहीर होणार असल्याचे मानले जात आहे. भाजप नेतृत्वाला उर्वरित सर्व 12 जागांसाठी एकाच वेळी उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे. पण, कैसरगंज जागेबाबत संदिग्धता आहे.
या जागेचे खासदार ब्रिजभूषण हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यास ठाम आहेत. पण, महिला कुस्तीपटूंबाबतचा देशभर गाजलेला वाद पाहता, पक्षनेतृत्व ब्रिज़भूषण यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला किंवा त्यांच्या मर्जीतील उमेदवारास तिकिट देण्यास तयार आहे.
ब्रिजभूषण यांना तिकीट दिल्यास विरोधकांना आयताच मुद्दा मिळेल, असे भाजप नेतृत्वाला वाटते आहे. ब्रिजभूषण यांच्या आडमुठेपणामुळे भाजप नेतृत्व आता खासदार-आमदार न्यायालय दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहत आहे.
ब्रिजभूषण यांच्याविरोधातील एका प्रकरणात अंतिम सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी निर्णयही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच सर्व १२ जागांसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असा मानले जात आहे.
भाजप नेतृत्वाने ब्रिजभूषण यांच्या पत्नी किंवा मुलगा प्रतीक भूषण यापैकी एकाला तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या ब्रिजभूषण यासाठी तयार नसून त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.
ज्या जागांवर उमेदवार घोषित केले जाणार आहेत त्यात मैनपुरी, रायबरेली, गाझीपूर, बलिया, भदोही, मच्छिलिशहर, प्रयागराज, फुलपूर, कौशांबी, देवरिया, फिरोजाबाद आणि कैसरगंज यांचा समावेश आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवारही एकत्र जाहीर केले जाणार आहेत. लोकसभेच्या १२ जागांसाठीच्या उमेदवारांच्या यादीसोबतच ज्या चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्या जागांसाठीच्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे.
यामध्ये लखनौ पूर्व, दादरौल (शाहजहानपूर), गासडी (बलरामपूर) आणि दुधी (सोनभद्र) यांचा समावेश आहे. त्यापैकी तीन जागांवर भाजपने, तर गासडीमध्ये सपा विजयी झाली.
आमदार आशुतोष टंडन आणि दादरौलचे आमदार मानवेंद्र सिंह यांच्या निधनामुळे लखनौ पूर्व ही जागा रिक्त झाली आहे. तर भाजपचे माजी आमदार रामदुलार गोंड एका खटल्यात दोषी ठरवल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने दुधी जागा रिक्त झाली आहे.
पोटनिवडणुकीसाठी केवळ लखनौ पूर्व जागेबाबतचा मुद्दा अडकला आहे. आशुतोष टंडन यांचे धाकटे भाऊ अमित टंडन यांना या जागेवर निवडणूक लढवायची आहे. त्याचबरोबर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हिरो वाजपेयी यांचा दावाही प्रबळ मानला जात आहे.