महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावी लागणार
पुणे – तात्पुरत्या कालावधीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात रूजू होणाऱ्यांना एक महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. ही महापालिकेने घातलेली तुघलकी अट त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिका आरोग्य विभागाने 45 दिवसांच्या तात्पुरत्या नेमणुकीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मासिक मानधन तत्त्वावर 300 डॉक्टर, 300 परिचारिका, 100 आया, 100 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा पदांची भरती करण्यात येणार आहे. या सर्व पदांसाठी किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्यापूर्वी एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल आणि त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही, अशी विचित्र अटही घालण्यात आली आहे.
महापालिकेने एका बाजूला काही संस्थांबरोबर करार केला असतानाही ही जाहिरात का काढण्यात आली, अशी विचारणा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.