रवींद्र कदम
नगर – गेल्या काही दिवसा पासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याचे सोशल मीडियावर चर्चेला उधान आले होते. त्यातच जगताप यांच्या बॅनरवरील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो ही दिसानासे झाले होते. मात्र, काल शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांची उमेदवारी फायनल झाली असता पुन्हा जगताप यांच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो झळकु लागले आहेत. त्यामुळे शहरात एकच चर्चेला उधान आले होते.
आमदार संग्राम जगताप लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते राष्ट्रवादी सोडून ते नेमकी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यासोबत भाजपात जातात की शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा शहरात होती. तसेच जगताप यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला अनेक वेळा गैरहजर राहिले होते. त्यामुळे शहरात पक्षांतराची चर्चा बळावली होती.
आचारसंहिंता लागण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी राज्य दौरा सुरु केला होता. त्यावेळी पवार हे नगरमध्ये आले. व आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पवार परतताच, राष्ट्रवादीच्या दोन गटात धक्का-बुक्की झाली.
राष्ट्रवादीचे एकनिष्ठ दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांनाही आमदारकीचे वेध लागले असल्यानेच जगताप गट व कळमकर यांच्यात वाद झाला. त्यांचा वाद थेट कोतवालीत पोलीस ठाण्यात पोहचाला. मात्र, वरिष्ठांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला.
यामध्यल्या काळात संग्राम जगताप यांच्या बॉनरवरील शरद पवार यांचे दिसानासे झाले होते. मात्र, शिवसेनेकडून उमेदवारी अनिल राठोड यांना जहिर होताच शरद पवार यांचे फोटो पुन्हा आमदार संग्राम जगताप यांच्या बॅनरवर झळकू लागले आहेत. आ. संग्राम जगताप यांनी शिवसेकडून उमेदवारीची आशा संपष्टात येताच राष्ट्रवादीकडून प्रचार सुरू केला असल्याचे चित्र आहे.