नागरिकांनो तुम्हीही सूचवा अंदाजपत्रकात विकासकामे

पुणे – महापालिका प्रशासनाकडून 2020-21 या आर्थिक वर्षाचे आयुक्‍तांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू केले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नागरिकांना या अंदाजपत्रकात आपल्या भागातील विकासकामे सूचविता येणार आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडून आवाहनही करण्यात आले असून येत्या 9 सप्टेंबरपर्यंत ही कामे सूचविता येणार आहेत. त्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांकडे अथवा पालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात 2006-07 पासून ही अभिनव संकल्पना राबविण्यात येते. त्यासाठी प्रत्येक प्रभागाला 1 कोटींचे अंदाजपत्रक असून प्रत्येकी 25 लाखांची जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंतची कामे नागरिकांना सूचविता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ता, पदपथ, पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, पथ दिवे अशा स्वरुपाची कामे यामध्ये आहेत, असे लेखापाल उल्का कळसकर यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.