चिमुकल्या दुर्गप्रेमीचं आदित्य ठाकरेंना पत्र; राजगडावरील रोप वे बद्दल केली तक्रार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मिती करताना निर्माण केलेले आणि अधिक मजबूत केलेले किल्ले जतन करायचे सोडून राज्य सरकार या किल्ल्यांवर पयटकांचा उपद्रव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, असे सांगत पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक दुर्गप्रेमींनी राजगडावरील रोप वे ला विरोध करण्याचे ठरवले आहे.

त्यातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका छोट्या दुर्गप्रेमीने पत्र लिहिले आहे. पत्रात या लहान मुलीने आदित्य ठाकरेंकडे रोप पे प्रकल्प बांधू नका अशी केविलवाणी विनंती केली आहे.

या पत्रात मजकूर लिहिण्यांत आला आहे की,’माननीय आदित्य दादा यांना पत्रास कारण की राजगडावर रोप वे बांधू नका. कारण गडावर आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरे असतात. आपण गर्दी केली हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरामागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ पुणे, असे या पत्रात म्हटले आहे. 

या लहान गडप्रेमी मुलीने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत रोप वे मुळे कसे नुकसान होऊ शकते हे आपल्या पत्रातून मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, श्री एकवीरा देवी मंदिर (कार्ला ता. मावळ) व राजगड किल्ला येथे रोप-वे उभारण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे.

हे दोन्ही रोप-वे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रोप-वे प्रकल्पासाठी निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबवण्यासाठी मुंबई येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.