मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले . यामुळे ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता ही लढाई चांगलीच अटीतटीची होणार आहे.
अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निवडणुकीतील विजयावर भाष्य करत ही निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’ मुरजी पटेल उमेदवारी जाहीर केली आहे. ते निवडणूक अर्ज भरायला जात आहेत. माझ्यासह अन्य भाजप नेते त्यांच्यासोबत हा फॉर्म भरायला जात आहेत. आम्हीच जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. शिवाय 51% मत घेऊ आणि अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक जिंकू.’ असे देखील ते म्हणाले आहे.