मुंबई – अभिनेत्री सारा अली खानचा फ्लाईटमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सारा नेहमी आपल्या हटके लूकमुळे चर्चेत असते परंतु सध्या ती फ्लाईटमधील आपल्या एका कृतीमुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे एका प्रवास करणाऱ्या व्यक्तीने लपून हा व्हिडीओ शूट केल्याचे समजते.
सारा अली खान आपल्या चाहत्यांना नेहमीच वेळ देत असते. चाहते देखील साराच सोशल मीडियावर भरभरून कौतुक करतात. सारा फ्लाईटमधून जात असताना तिच्या एका चाहत्याने सेल्फी मागितला,तर साराने अगदी प्रेमाने स्वतः फोटो काढून दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. फॅन्ससोबतचे साराचे प्रेम पाहून सर्वांनाच अगदी आनंद झाला आहे.
Check out the humble behaviour of #saraalikhan in flight from Delhi to Mumbai. She gave selfies to everyone with warm gesture. #exclusive @SaraAliKhan pic.twitter.com/61iFwddDRz
— Crazy 4 Bollywood 💙 (@crazy4bolly) October 12, 2022
अनेकांनी तर यावेळी सारासोबत एक क्रिकेटर असल्याचे देखील कमेंटमध्ये म्हंटले आहे. मात्र व्हिडिओमध्ये तस काही दिसत नसल्याने तो नेटकऱ्यांचा खोडसाळपणा असल्याचे दिसून येते. आपल्या चाहत्यांप्रती साराचे दाखवलेले प्रेम पाहून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.