आमदार मेधा कुलकर्णी व येथील मतदारांवर अन्याय करून कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. बाणेर-बालेवाडी येथे कर्म्फट झोन सोसायटीत प्रचारासाठी पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मेधा कुलकर्णी यांच्यासह येथील सर्व लोकप्रतिनिधिंनी चांगले काम केले आहे; परंतु पक्ष नेतृत्वाच्या इच्छेखातर मी निवडणूक लढवत असून सर्वांनी सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
भाजपच्या सत्ता काळात सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम पक्षाने केल्याचेही पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चे समन्वयाने शांततेत हाताळले गेले. 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीसह जनसामान्यांचे प्रश्न सरकारने प्राधान्याने सोडवल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, बाणेर येथील बंटारा भवन येथे बंट समाजबांधवांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली.