महाळुंगे इंगळे – राजकारणातील सध्याची शिवसेनेची स्थिती पाहता शिवसेनेसोबत अनेकांनी बंड पुकारले आहे; परंतु चाकण (ता. खेड) येथील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून ठाकरेंना कधीही सोडणार नाही आमची निष्ठा सदैव मातोश्री बरोबर राहणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे यांनी दिली आहे.
महाळुंगे इंगळे, चाकण आणि परिसरातील शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उभे राहून पक्ष वाढविण्याची ग्वाही दिली.