Caste Based Census : बिहारच्या नितीश कुमार सरकारने आजच्या गांधी जंयतीच्या मुहूर्तावर जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर करण्यात आली आहे. त्यातच हा नितीशकुमार यांचा मास्टरस्ट्रोक मनाला जात आहे.
दरम्यान, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी आज बिहारमध्ये करण्यात आलेल्या जाती आधारित जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. बिहारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
यावेळी त्यांनी बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे.
बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. तर मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत. दरम्यान, भाजपच्या लोकसभा २०१४ व २०१९ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणनेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता ही आता बिहारच्या सरकारने पूर्ण करून दाखवले आहे.
बिहारच्या जाती जनगणनेतील 10 मोठे मुद्दे
1- बिहारमधील एकूण लोकसंख्या 13 कोटी 7 लाख 25 हजार 310 आहे.
2- बिहारमध्ये 27% ओबीसी (मागासवर्गीय) लोकसंख्या आहे.
3- राज्यात अत्यंत मागासवर्गीय लोकसंख्या 36% आहे.
4- बिहारमध्ये एससी श्रेणीची लोकसंख्या 19% आहे.
5- अनुसूचित जमातीची म्हणजेच एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 1.68% आहे.
6 – बिहारमध्ये अनारक्षित (सर्वसाधारण) संख्या 15.52% आहे.
7- ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे.
8 – बिहारमधील भूमिहारची लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या १४ टक्के आहे.
9- बिहारमध्ये कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या ४० टक्के आहे.
10 – बिहारमध्ये राजपूतांची लोकसंख्या 3.45 टक्के आहे.