मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. मात्र आता या वाघनखावरून महाराष्ट्रात राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वाघनखांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला काही प्रश्न विचारले होते. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यावर स्पष्टीकरण हवे असल्याचे म्हंटले होते. मात्र आता भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar)यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
“वाघनखं परत आणणार असं आम्हाला सांगितलं होतं. राज्य सरकारकडून यावर मला स्पष्टीकरण पाहिजे. छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांशी खेळ कुठेही नको. म्हणून स्पष्टपणे दोन-तीन प्रश्न विचारतो” असं आदित्य ठाकरे शनिवारी म्हणाले. “व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयाच्या वेबसाइटवर सांगितलय की, ही वाघनखं जेम्स ग्रॅण्ड डफ हे इतिहासाकार होते, त्यांच्या कलेक्शनमधली आहेत. जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं महाराजांनीच वापरली. पण व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझिमच्या वेबसाइटवर म्हटलय की, महाराजांनीच ही वाघनखं वापरली हे सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठही नको, स्पष्टीकरण हवय” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर
आशिष शेलार यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये शेलार यांनी लिहील की, “वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीयइथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?”
वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीयइथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2023
पुढे त्यांनी लिहिले की, “आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?, असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.