Bus Accident at Goa : पणजीहून (Panaji) हैदराबादला (Hydrabad) निघालेल्या खाजगी बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात खासगी बसला धारबांदोडा येथे अपघात होऊन चालक जागीच ठार झाला आहे. या अपघातात (Accident) इतर 25 जण जखमी झाले आहेत.
जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या एका वळणावर बस आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. यावेळेला या बसमध्ये 23 प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते.
भरधाव बसचा अचानक अपघात होऊन एका बाजुला कलंडल्याने प्रवाशांनी आरडाओरड केली. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढले. बसचा चालक गाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन चालक आणि 23 प्रवासी जखमी झाले आहेत.
बस कलंडल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची मदत केली. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.