South Cinema : जेलरच्या यशानंतर, सुपरस्टार रजनीकांतचा ‘थलाइवर 170’ येत्या काही आठवड्यांत फ्लोरवर जाण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत सातत्याने अपडेट्स येत आहे. दरम्यान, या चित्रपटात आणखी काही स्टार्सनी एन्ट्री केली आहे. या चित्रपटात मंजू वारियर, दुशारा विजयन आणि रितिका सिंग यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे गनानवेल करणार आहे. सध्या चित्रपटाचे तात्पुरते नाव ‘थलाइवर 170’ ठेवण्यात आले आहे. याआधी टीजेने ‘जय भीम’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी अनिरुद्ध रविचंदरची निवड करण्यात आली आहे.
2 ऑक्टोबर रोजी, लायका प्रॉडक्शनने टीममध्ये नवीन कलाकारांच्या समावेशाची घोषणा केली आणि प्रत्येकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. टीमचा भाग झाल्यानंतर रितिकानेही इन्स्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला आणि निर्मात्यांचे आभार मानले.
सुपरस्टार रजनीकांत शेवटचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘जेलर’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने जगभरात 650 कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे. सुपरस्टार सध्या ब्रेकवर आहे आणि ऑक्टोबरमध्ये कधीतरी ‘थलाईवर 170’ ची शूटिंग सुरू करणार आहे. टीम येत्या काही दिवसांत कलाकारांच्या उर्वरित सदस्यांची घोषणा करेल. रिपोर्ट्सनुसार, राणा दग्गुबती, फहद फासिल आणि मंजू वॉरियर देखील कलाकारांचा भाग आहेत. ‘थलैवर 170’ 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.