Entertainment – बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय -बच्चनने (Aishwarya Rai) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. वयाचा पन्नाशीत देखील ती खूप सुंदर दिसते. आजही भारतासह परदेशातही लाखो चाहते आहेत. नुकतेच ऐश्वर्याने पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रॅम्पवर तिचा जलवा पहायला मिळाला. तिच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या गोल्डन कलरचा सुंदर गाऊन परिधान केला होता. तिच्या या लुकने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. आजही ती तितकीच सुंदर दिसत आहे. तिचा रॅम्पवॉक पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच तिची स्टाइल आणि लुक पाहून नेटकऱ्यांनी देखील तिचे कौतुक केले आहे. सध्या येथील ऐश्वर्याचे रॅम्पवॉकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
She saw jaya and shweta in the audience and said let me gag them a bitpic.twitter.com/7w9RccEYeB
— grathie lethbian (@silamsiva) October 2, 2023
दरम्यान, पॅरिस फॅशन वीकदरम्यान प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ लॉरियल पॅरिसतर्फे फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. केंडल जेनर, इव्हा लाँजोरिया, अँडी मॅकडॉवेल, हेलेन मिरेन, अजा नाओमी किंग, वोयला डेविस यांच्यासोबतच ऐश्वर्यासुद्धा या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. सध्या तिचे हे फोटो पाहून नेटकरी देखील ‘सोनेरी जलपरी’ असे म्हणत तिचे कौतुक करत आहेत. ऐश्वर्या शेवटी मणिरत्नमच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.