Jasprit Bumrah 5 Wicket haul In South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला 176 धावांत गुंडाळले. या सामन्यात सर्व 20 विकेट भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा केवळ तिसरा सामना होता जेव्हा वेगवान गोलंदाजांनी सर्व विकेट घेतल्या. यापूर्वी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध असे घडले होते. त्या दोन्ही सामन्यांमध्ये बुमराहनेही शानदार गोलंदाजी केली होती. या डावात सहा विकेट घेण्यासोबतच बुमराहने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज
बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत 38 बळी घेतले आहेत. या देशात सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अनिल कुंबळे 45 विकेट्ससह पहिल्या तर जवागल श्रीनाथ 43 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनिल कुंबले : 45
जवागल श्रीनाथ : 43
जसप्रीत बुमराह : 38*
मोहम्मद शमी : 35
जहीर खान : 30
सेना देशांत सर्वाधिक 5 बळी घेणारे भारतीय गोलंदाज
बुमराहने सेना SENA देशांमध्ये ( S : दक्षिण आफ्रिका, E : इंग्लंड, N : न्यूझीलंड, A : ऑस्ट्रेलिया) सहाव्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत तो फक्त कपिल देव यांच्या मागे आहे, कपीलने सेना देशांतील सामन्यांमध्ये सात वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. भागवत चंद्रशेखर आणि झहीर खान यांनी देखील सेना देशांमध्ये सहा वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
कपिल देव : 7
भागवत चन्द्रशेखर : 6
जहीर खान : 6
*जसप्रीत बुमराह : 6
आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज…
बुमराहने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत जवागल श्रीनाथची बरोबरी केली आहे. या दोघांनी आफ्रिकेच्या भूमीवर तीनदा ही कामगिरी केली आहे.
जवागल श्रीनाथ : 3
*जसप्रीत बुमराह : 3
व्यंकटेश प्रसाद : 2
एस श्रीशांत : 2
मोहम्मद शमी : 2
न्यूलँड्स येथे सर्वाधिक कसोटी बळी घेणारा विदेशी गोलंदाज…
न्यूलँड्सच्या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मैदानात त्याने आतापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडचा कॉलिन ब्लिथ 25 विकेट्ससह या यादीत अव्वल स्थानावर आहे.
कॉलिन ब्लिथ (इंग्लंड) : 25
*जसप्रीत बुमराह (भारत) : 18
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : 17
जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 16
जॉनी ब्रिग्ज (इंग्लंड) : 15
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 5 विकेट घेण्याची कामगिरी ही बुमराहने तिसऱ्यांदा केली. याशिवाय बुमराहने इंग्लंडमध्ये 2, वेस्ट इंडिजमध्ये 2 आणि ऑस्ट्रेलियात 1 वेळा अशी कामगिरी केली आहे. बुमराहचे हे आकडे पाहता हे स्पष्ट होते की तो केवळ मायदेशातच नाही तर परदेशातही आपल्या गोलंदाजीने आगपाखड करतो.
या सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने 2 बळी घेतले होते. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या होत्या. अशा प्रकारे बुमराहने आफ्रिकेत आपला प्रभाव कायम ठेवला आहे.