Jasprit Bumrah Record : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (MI vs RCB) विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. बुमराहने आरसीबीविरुद्ध पाच विकेट्स घेत एक मोठी कामगिरी केली, जी त्याच्याशिवाय इतर कोणीही बेंगळुरू संघाविरुद्ध आतापर्यंत करू शकले नाही.
वास्तविक, जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 21 धावा देत 5 बळी घेतले. यापूर्वी, RCB विरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची होती, ज्याने 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 10 धावांत 4 बळी घेतले होते.
तसेच आणखी एक विक्रम म्हणजे जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो आयपीएलचा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी जेम्स फॉकनर, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी ही कामगिरी केली होती. आता बुमराहही त्यांच्यात सामील झाला आहे.
जसप्रीत बुमराहने आरसीबीविरूध्दच्या सामन्यात कोहलीच्या रूपात पहिली विकेट घेतली. यानंतर त्याने कर्णधार फाफ डुप्लेसिस (61), लोमरोर (0), सौरव चौहान (9) आणि विजय कुमार (0) यांना बाद केले.