South Africa vs India 2nd Test : न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 176 धावांत गडगडला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात कहर केला तर जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात पाहुण्या संघासाठी अडचणीचा ठरला. बुमराहने दुसऱ्या डावात 61 धावांत 6 बळी घेतले. आता भारताला विजयासाठी फक्त 79 धावा करायच्या आहेत.
Lunch on Day 2!
South Africa are all out for 176 runs in 2nd innings.#TeamIndia need 79 runs to win the 2nd Test.
Jasprit Bumrah picks up six wickets.
Scorecard – https://t.co/j9tTnGM2rn #SAvIND pic.twitter.com/xFA25tugvU
— BCCI (@BCCI) January 4, 2024
दुसऱ्या डावात सलामीवीर एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेकडून शानदार शतक झळकावले. मार्करामने 103 चेंडूत 106 धावांची खेळी खेळली. मार्करामने दमदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला डावाच्या पराभवापासून वाचवले. मार्करामने आपल्या शतकी खेळीत 17 चौकार आणि 2 षटकार मारले.
एकटाच लढला एडन मार्करम…
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर यश मिळाले नाही. मात्र, एडन मार्कराम एकटा उभा राहिला. एका बाजूला सतत विकेट पडत राहिल्या तर दुसऱ्या बाजूला मार्कराम वेगाने धावा काढत राहिला.
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने खेळ सुरू केला तेव्हा एडन मार्कराम आणि डेव्हिड बेडिंगहॅम क्रीजवर होते. याआधी पहिल्या दिवशी शेवटच्या कसोटी डावात डीन एल्गर १२ धावा, टोनी डीजॉर्ज ०१ आणि ट्रस्टन स्टब्स ०१ धावा करून बाद झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेडिंगहॅम 11 , यष्टिरक्षक फलंदाज काइल व्हर्न 09, मार्को जॅनसेन 11, केशव महाराज 03, कागिसो रबाडा 02 आणि लुंगी नगिडी 08 धावा करून बाद झाले.
बुमराहसमोर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज अस्वस्थ दिसत होते. बुमराहने ट्रस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हर्न, मार्को जॅनसेन, केशव महाराज आणि लुंगी नगिडी यांना आपले बळी बनवले. बुमराहशिवाय दुसऱ्या डावात मुकेश कुमारने दोन आणि मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
Ranji Trophy 2023-24 : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी केदार जाधव…
पहिल्या डावात आफ्रिका 55 धावांत गारद
याआधी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडल्या होत्या. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत आटोपला. यानंतर भारताने पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली होती. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने अवघ्या 15 धावांत 6 बळी घेतले.