Neha Pendse : मराठी चित्रपटांपासून ते बॉलीवूड आणि टीव्हीपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत (Neha Pendse) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी झाली आहे. नेहा पेंडसेच्या घरातून तब्बल सहा लाखांचे दागिने गायब झाल्याची घटना घडली आहे.
या चोरीची तक्रार नेहाचा पती शार्दुल सिंग बियास याच्या चालकाने पोलिसात दाखल केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तपासादरम्यान पोलिसांनी नेहाच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक देखील केली आहे.
वांद्रे वेस्टमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे घर आहे. अरोटो बिल्डिंगच्या 23 व्या मजल्यावर तिचे निवासस्थान आहे. ड्रायव्हर रत्नेश झा याने याबाबत बोलताना म्हटले की, चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 6 लाख रुपये इतकी आहे. ही चोरी 28 डिसेंबरला झाली होती. सोन्याच्या बांगड्या आणि हिरा लावलेल्या अंगठीचा यामध्ये समावेश आहे. नेहाला हे दागिने विवाहप्रसंगी भेट मिळाले होते.
शार्दुल घरी परतल्यानंतर नोकर सुमित कुमार सोलंकी याच्याकडे दागिने योग्य जागेवर ठेवण्यासाठी देत होता. घटना घडली तेव्हा सुमित सोलंकी बाहेर जाण्याची तयारी करत होता. त्याच दिवशी दागिने लंपास झाल्याची माहिती नेहाच्या पतीला मिळाली.
त्यामुळे नेहाच्या पतीने नोकर सुमित सोलंकीवर संशय घेतला होता. त्यांनी कामगारांची चौकशी केली असता सोलंकी बेपत्ता असून चौकशी केली. मात्र तो त्यांना न सांगता कुलाबा येथे नातेवाईकाच्या घरी गेल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी सुमित सोलंकी अटक केली. सुमितला अटक झाली असली तरी दागिने अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
दरम्यान, या सर्व घटने बद्दल अभिनेत्री नेहा पेंडसे हिला विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, “मला याबद्दल बोलणे सोयीचे वाटत नाही. ही बातमी कशी लीक झाली हे मला माहीत नाही, मी खूप अस्वस्थ होते. होय माझे घर लुटले गेले. जे काही बोलले जात आहे ते खरे आहे.’ असं नेहा पेंडसेने म्हटलं आहे.
कोण आहे? अभिनेत्री नेहा पेंडसे…..
नेहा पेंडसेने हिंदी, मराठीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती.
नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेते.