Virat Kohli vs Jasprit Bumrah : आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांच्यात नेहमीच लढत होत असते, मात्र बुमराहने गुरुवारी ती जिंकली. आयपीएल 2024 मधील एमआय विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यानही चाहत्यांनी त्याचा आनंद लुटला पण तो फार काळ टिकला नाही, कारण बुमराहने तिसऱ्याच षटकातच कोहलीला घातक चेंडूने चारी मुंड्या चीत (Out) केलं. कोहलीने केवळ 3 धावा केल्या.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह देशासाठी एकत्र खेळतात आणि दोघेही असे खेळाडू आहेत ज्यांना प्रत्येक क्रिकेटर घाबरतो. पण जेव्हा हे दोघे आयपीएलमध्ये आमनेसामने येतात तेव्हा हा सामना पाहण्यासारखा असतो.
जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कोहलीला बाद केले. आत येणारा चेंडू विराट कोहली समजू शकला नाही आणि चेंडू बॅटची आतील कडा घेऊन यष्टिरक्षक इशान किशनच्या हातात गेला.
Boom Boom Bumrah!@Jaspritbumrah93 comes into the attack and gets the big wicket of Virat Kohli.
Live – https://t.co/7yWt2uizTf #TATAIPL #IPL2024 #MIvRCB pic.twitter.com/1QbRGjV2L0
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
याआधीही कोहलीला चेंडू समजू शकला नाही, त्यानंतर चेंडू थेट पॅडवर आदळला. त्यावर अपील झाले पण पंचांनी तो नाबाद घोषित केला. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने डीआरएस न घेण्याचा सल्ला दिला, जो हार्दिक पांड्याने मान्य केला.
दरम्यान, जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये पाचव्यांदा विराट कोहलीची विकेट घेतली आहे. बुमराहने आयपीएलमधील पहिली विकेटसुध्दा कोहलीच्या रूपाने घेतली होती. 4 एप्रिल 2013 रोजी, बुमराहने कोहलीची पहिली विकेट घेतली, तेव्हा कोहलीला त्यानं पायचीत करत (LBW) बाद केलं होते. तेव्हापासून बुमराहने कोहलीला 5 वेळा बाद केले आहे.