Jasprit Bumrah made a big record in his name in IPL 2024 : मुंबई इंडियन्सने रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मोसमातील आपले विजयाचे खाते उघडले. या सामन्यात चाहत्यांना रोमॅरियो शेफर्डची तुफान खेळी पाहायला मिळाली. तसेच बुमराहने आयपीएलमध्ये 150 बळी पूर्ण केले आहेत. यासह बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
बुमराहने चार षटकांत 22 धावा देत दोन विकेट घेतल्या. त्याने प्रथम पृथ्वी शॉला 66 धावांवर बोल्ड केले. त्याची आयपीएल कारकिर्दीतील ही 149 वी विकेट होती. यानंतर त्याने अभिषेक पोरेलची विकेट घेतली. त्याच्या चेंडूवर अभिषेकला टिम डेव्हिडने झेलबाद केले. पोरेल हा बुमराहचा 150 वा बळी ठरला.
भुवी आणि ब्राव्होला सोडले मागे..
बुमराहने 124 डावात 150 विकेट घेतल्या. सर्वात जलद 150 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. या बाबतीत लसिथ मलिंगा अव्वल आहे ज्याने 105 डावात 150 विकेट्स घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहलने 118 डावात ही कामगिरी केली. बुमराह ड्वेन ब्राव्हो आणि भुवनेश्वर कुमारच्या पुढे गेला. ब्राव्होने 137 तर भुवनेश्वरने 138 डावात 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…
बुमराहनेही मुंबई इंडियन्ससाठी केला विक्रम…
बुमराहने 2013 साली मुंबईसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो त्याच संघाकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा बुमराह दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने मुंबईसाठी 124 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाने मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मुंबई इंडियन्सकडून 170 विकेट घेतल्या आहेत.