नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही भारताला करोनाविरुद्ध लढण्यासाठी एक बिटकॉईन अर्थात 40 लाख रुपये इतकी मोठी रक्कम लीने देणगीदाखल देत असल्याचे आज जाहीर केले आहे.
कालच पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी रक्कम भारत सरकारच्या पीएम केअर्ससाठी दान केल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक खेळाडू त्याचे अनुकरण करताना दिसत आहेत.
भारतामध्ये कोव्हिडच्या लढ्यासाठी बेडसची मोठी गरज आहे. रेमडिसिव्हरचे औषध, लसी आणि ऑक्सिजनची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. अशा स्थितीत माझ्या -सारख्यासाठी दुसरे घरच असलेल्या भारतीयांप्रती संवेदनशील रहाणे, हे मी माझे कर्तव्य समजतो आणि ही देणगी जाहीर करतो, असे ब्रेट लीने ट्विटरवर म्हटले आहे.