नवी दिल्ली – येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ अल कायदा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा ई-मेल विमानतळ पोलिसांना आल्याने विमानतळाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मात्र विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या तपासात त्यात काही ठोस नसल्याचे आढळले आहे.
विमानतळ पोलिस ठाण्यातून हवाई मार्ग नियंत्रण केंद्राला या इंमेल्सची माहिती शनिवारी देण्यात आली. सिंगापूरमधून कारनानबीर सुरी महंमद जलाल आणि त्याची पत्नी शैला शरद उर्फ हसीना रविवारी भारतात येणार आहे. त्यानंतर तीन दिवसांत ते बॉम्ब ठेवण्याची शक्यता आहे.
या धमकीचा ई मेल आल्यानंतर तातडीने विमानतळावर ताताडीने बॉम्ब धोका परीक्षण समिती विमान तळावर तातडीने तैनात करण्यात आली. त्यानंतर त्यात काही ठोस नसल्याचे स्पष्ट झाल्यावर समिती तेथून निघाली. त्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीॅ.
धमकीच्या या ई मेल्सची तपासणी करताना अशाच स्वरूपाचा ई मेल्स यापुर्वीही आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याही ई मेल्समध्ये हीच दोन नावे आणि अन्य तपशील ही समान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धमकीचा ई मेल्स आल्या नंतर आचारसंहितेनुसार तो संबंधित यत्रणांना पाठवण्यात आला. त्याचवेळी विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना अतीसतर्कतेचा आदेश देण्यात आला. विमानतळावर येणाऱ्या वाहनांची कडेकोट तपासणी करण्यात येत आहे.