Yana Mir । मागच्या दोन दिवसापूर्वी लंडनमधील ब्रिटिश संसदेत पाकिस्तानला फटकारणाऱ्या काश्मिरी पत्रकाराचे सर्वत्र कौतुक झाले होते. याना मीर असे काश्मिरी पत्रकाराचे नाव आहे. एकीकडे जगभर यानाचे कौतुक होत असताना दुसरीकडे दिली विमानतळावर तिच्यासोबत गैरव्यव्यहार करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. याविषयी यानाने स्वतः याची माहिती दिलीय.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅग स्कॅन करताना अपमानाचा सामना करावा लागल्याचा दावा याना मीरने केलाय. तर दुसरीकडे दिल्ली कस्टम्स विभागाने IGI विमानतळावरील बंदी स्कॅन करण्यास सांगितल्याने याना मीरला अपमानास्पद वाटल्याचे म्हटलंय. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बॅग स्कॅनिंग नियमितपणे केले जाते, तसेच कोणीही कायद्याच्या वर नसल्याचे कस्टम्स विभागाने म्हटले आहे.
Bag scanning of international passengers is done routinely. While other paxs put their luggage inside the scanner without any fuss
Ms. Yana Mir felt needlessly offended. Staff remained courteous throughout.Privileges are not above law. Footage tells the story. pic.twitter.com/vpwn4MMVQt— Delhi Customs (Airport & General) (@AirportGenCus) February 26, 2024
याना मीर अलीकडेच लंडनमधील ब्रिटिश संसदेत दिलेल्या भाषणामुळे चर्चेत आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या अपप्रचाराचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच मी काश्मीरमध्ये पूर्णपणे मुक्त आहे, असे त्यांनी म्हटले.
दिल्ली कस्टम्स काय म्हणाले? Yana Mir ।
दिल्ली कस्टम्सने एक व्हिडिओ जारी केला. ज्यात बॅग तपासणीच्या याना मीरच्या दाव्यावर आपले मत व्यक्त केले. कस्टम्सने सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे बॅग स्कॅनिंग नियमितपणे केले जाते. इतर प्रवाशांनी कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे सामान स्कॅनरच्या आत ठेवले. पण याना मीरला विनाकारण वाईट वाटलं. यावेळी कस्टम कर्मचाऱ्यांनी नम्र वर्तन केले. कायद्याच्या वर कोणीही नाहीत. व्हिडिओ संपूर्ण घटनाक्रम दिसत आहे. यासाठी कस्टम्स विभागाने एक व्हिडिओ जारी केला आहे.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये कस्टम विभागाने, ‘जेव्हा याना मीरला तिची बॅग स्कॅन करण्याची विनंती केली गेली तेव्हा तिने अजिबात सहकार्य केले नाही. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, त्यांचे सामान शेवटी एअरलाइन कर्मचारी आणि कस्टम अधिकाऱ्यांनी स्कॅनिंगसाठी उचलले.
काय म्हणाली याना मीर? Yana Mir ।
मात्र, दिल्ली कस्टमच्या पोस्टला उत्तर देताना याना मीर म्हणाली, ‘तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मला स्कॅन करण्यास सांगताच मी मशीनजवळ गेले. उलट सरकारी कर्मचाऱ्यांना असे वाटले की मला सूटकेस मशीनवर ठेवण्यास किंवा ट्रॉलीमध्ये परत ठेवण्यास मदत करणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. असा आरोप देखील त्यांनी केला.