पुणे – पतंजली स्टोअरची फ्रेंचाईस देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची 5 लाख 70 हजाराची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी राघवेंद्र कुलकर्णी(46,रा.बाणेर) यांना एका व्यक्तीने फोन करुन तुमच्या भावास पतंजलीची फ्रेंचाईस चालू करुन देतो असे सांगितले. यानंतर त्यांना ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी दोन बॅंक खात्यांवर 5 लाख 70 हजार वर्ग करण्यास सांगितले. पैसे पाठवल्यानंतरही त्यांना फ्रेंचाईस देण्यात आली नाही.
त्यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक लांबतुरे करत आहेत.