मुंबई – मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच आरबीआयला धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला आहे. ईमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे.
ईमेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
Maharashtra | RBI received a threatening email, in the email, it was said that bombs would be planted in RBI office, HDFC bank and ICICI bank and demanded the resignation of RBI governor Shaktikanta Das and Union Finance Minister Nirmala Sitharaman. A total of 11 bomb threats…
— ANI (@ANI) December 26, 2023
एकूण 11 ठिकाणी बॉम्ब
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या सर्व ठिकाणी भेट देऊन तपास केला, मात्र तेथे काहीही आढळून आले नाही.