जेरूसेलेम – अफगाणीस्तानमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तान कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. अफगाणीस्तान हा अस्थीर आणि युध्दजन्य स्थितीत रहावा, यासाठी त्या देशाचे प्रयत्न सुरू असल्याचे मत सेंटर ऑफ पॉलिटिकल अँड फॉरेन अफेअरचे अध्यक्ष फाबियन बौसार्ट यांनी व्यक्त केले.
अफगाणस्तिान हा नेहमी दबलेला रहावा त्यासाठी पाकिस्तान प्रयत्नरत असतो. अफगाणस्तिानचे तसे असणे हे पाकिस्तानसाठी भू राजकीय लाभाचे आहे, असे बौसार्ट यांनी आपल्या टाईम्स ऑफ इस्रायलमधील स्तंभात म्हटले आहे. ते म्हणाले, तालिबानच्या गटांना पाकिस्तान नेहमी पाठिंबा देतो. आणि त्यांच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करण्याला परवानगी देत असल्याची भीती अफगाणीस्तानला नेहमी वाटत असते.
संयुक्त राष्ट्रातील अफगाणीस्तानचे राजदूत गुलाम इसकझाई म्हणाले, संयुक्त राष्ट्रे सुरक्षा समितीला पाकिस्तानच तालिबानसाठी पुरवठा साखळी असल्याचे सबळ पुरावे द्यायला आम्ही तयार आहोत. काही आठवड्यांपुर्वी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या फौजांनी अफगाणीस्तानमधून माघार घेतल्यानंतर तेथील हिंसाचारात वाढ झाली आहे. अफगाणी अधिकाऱ्यांनी पाकिस्तान तालिबानला मदत करत असल्याचा आरोप केला आहे.