Bollywood Actress Struggle Story | अभिनेत्री रवीना टंडनने नुकतेच ओटीटी पदार्पण केले. बऱ्याच दिवसांनी ती पडद्यावर प्रेक्षकांमध्ये दिसली. ती सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते रवी टंडन यांची मुलगी आहे. असे असतानाही देखील रविनाला कोणत्याही गॉडफादरच्या पाठिंब्याशिवाय चित्रपटसृष्टीत पाऊल टाकावे लागले.
या ग्लॅमर दुनियेचा एक भाग बनण्याच्या प्रवासाची आठवण करून देताना रविना टंडनने उघड केले की सुरुवातीला तिला अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा नव्हती. एका क्षणी काहीतरी घडले जेव्हा एका टॅलेंट स्काउटने तिला शोधून काढले आणि थेट शॅम्पू जाहिरातीसाठी भूमिका देऊ केली.
तिने पुढे सांगितले की,’तिचे फोटोशूट फोटोग्राफर शंतनू शेरे यांनी केले आहे. जेव्हा ती प्रसिद्धीच्या झोतात आली तेव्हा तिच्या वडिलांनी कोणतीही मदत केली नाही. फक्त मार्गदर्शन केले. तिचे वडील लोकांकडे गेले नाहीत. अभिनेत्रीने सांगितले की शेवटी तिने कोणत्याही गॉडफादरवर अवलंबून न राहता स्वतःचा मार्ग बनवला. आपल्या कारकिर्दीचे श्रेय रविना नशिबाला देते आणि मान्य करते की कष्टाला कुठलाही पर्याय नाही. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात कठीण टप्प्यातून जावे लागते. तिच्या वडिलांनाही काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. रवीनाला तो काळ आठवला जेव्हा ती बसने प्रवास करायची आणि त्यावेळी खिशात फक्त 1 रुपया भाडे असायचे. मी पण हे सर्व सहन केले आहे. त्या पैशासाठी आम्ही खूप मेहनत घेतली.’ असं म्हणत तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत सांगितले
रवीनाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, OTT वर येणाऱ्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटात ती दिसणार आहे.