Kalki 2898 AD New Release Date| अभिनेता प्रभासचा आगामी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. यात प्रभाससह दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन देखील असल्याने अनेकजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी हा चित्रपट 9 मे रोजी रिलीज होणार होता. आता हा चित्रपट जुनमध्ये रिलीज होणार आहे.
निर्मात्यांनी 27 एप्रिल रोजी संध्याकाळी ‘कल्की 2898 एडी’ चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी घोषणा केली आहे की हा चित्रपट आता 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजे चित्रपट नियोजित तारखेपासून दीड महिना पुढे ढकलला गेला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन याचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटासाठी एकुण 600 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. Kalki 2898 AD New Release Date|
All the forces come together for a better tomorrow on 𝟐𝟕-𝟎𝟔-𝟐𝟎𝟐𝟒.#Kalki2898AD @SrBachchan @ikamalhaasan #Prabhas @deepikapadukone @nagashwin7 @DishPatani @Music_Santhosh @VyjayanthiFilms @Kalki2898AD #Kalki2898ADonJune27 pic.twitter.com/xws41MNLQP
— Kalki 2898 AD (@Kalki2898AD) April 27, 2024
या चित्रपटात प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांच्याशिवाय आणखी दोन मोठे स्टार्स आहेत. हे दोघे दुसरे कोणी नसून साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटानी आहेत. गेल्या आठवड्यात या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Kalki 2898 AD New Release Date|
या टिझरमध्ये अमिताभ हे अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं रिव्हील करण्यात आलं. अश्वत्थामा शिवलिंगाची पूजा करत असताना अचानक त्यांना काही संकेत दिसतात आणि ते ‘वेळ जवळ आली’, असं म्हणतात आणि स्वतःची अश्वत्थामा ही ओळख उघड करतात. तर प्रभास या सिनेमात भैरव ही भूमिका साकारत असून दीपिका पद्मा ही भूमिका साकारत आहे. तर कमल हसन कालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मात्र आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा:
अभिनेता साहिल खान महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ताब्यात; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई