Asha Bhosle Grand Daughter Debut| सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची गाणी आजही तितक्याच आनंदाने ऐकली जातात. देशासह जगभरात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यातच आता आशा भोसले यांची नात जनाई चर्चेत आली आहे. जनाई ही आता बॉलीवूड डेब्यू करणार आहे.
एका ऐतिहासिक भूमिकेतून ती सिने क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या बॉलीवूड पदार्पणाबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ असे सिनेमाचे नाव असून यातून संदीप सिंह देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. आतापर्यंत त्यांनी निर्मात्याची जबाबदारी पार पाडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Asha Bhosle Grand Daughter Debut|
त्यात आशा भोसले यांच्या उपस्थितीत संदीप यांनी घोषणा केली की त्यांनी या सिनेमात जनाईला सईबाईंच्या भूमिकेसाठी निवडले आहे. जनाईसाठीही हा सुखद धक्का होता. त्यांनी अशी घोषणा करताच जनाईने संदीप यांना अभिवादन केले आणि ती आशा भोसलेंच्या पाया पडली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते.
View this post on Instagram
‘द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्रपट मोठ्या स्तरावर तयार केला जात असून 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देशभरात प्रदर्शित केला जाईल. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली असून ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
जनाईबद्दल सांगायचे झाले तर, ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. याआधी आशा भोसलेंसोबत ती अनेकदा स्पॉट झाल्याने तिच्याविषयी चर्चा झाली होती. ती आशा यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई ही चांगली गायिका देखील आहे. Asha Bhosle Grand Daughter Debut|
हेही वाचा:
“गडकरीजी तुमचं नशीब मोदींच्या हातात नसून तुमच्या हातात मोदींचं नशीब” ; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका