नवी दिल्ली – ‘कॅप्टन कूल’ म्हणून सर्वपरिचित असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या ट्विटर खात्यावरील ब्लु-टिक हटवण्यात आली आहे. मागील वर्षी १५ ऑगस्टला धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होत.
यानंतर तो सोशल मीडियावर बऱ्यापैकी निष्क्रिय झाला होता. धोनीच्या अकाउंटवरील ब्लु-टिक हटवण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जातंय.
नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या खात्यांना ब्लु-टिक प्रदान केली जाते. यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सना सेलिब्रिटींचे खरे अकाउंट कोणते आहे, हे सहजासहजी ओळखता येत. तसेच सोशल मीडियावर एकाच नावाने उघडलेल्या अकाउंट्समुले उडणारी धांदल कमी होते.
दरम्यान, महेंद्र सिंह धोनी जरी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जास्त प्रमाणात सक्रिय नसला तरी त्याची पत्नी साक्षी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते.