मुंबई – खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडूने त्याच्या खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर त्याला यश निश्चितच मिळते, असा विश्वास भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केला आहे. एका खासगी कार्यक्रमात तो बोलत होता.
एक कर्णधार म्हणून तुमच्या खेळाडूंचा आदर करणे महत्त्वाचे आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना समजून घेत नाही, तोपर्यंत त्यांचा विश्वास जिंकणे कठीण आहे. खेळाडूंचा आदर तुमच्या पदावरून नव्हे तर कृतीतून मिळतो. आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका, तो कमवा, कारण ते खूप नैसर्गिक आहे. ती निष्ठा तुमच्यात आली की संघाची कामगिरीही तशीच असेल.
मला नेहमीच वाटत होते की एक कर्णधार म्हणून आदर मिळवणे महत्त्वाचे आहे, कारण ते खुर्ची किंवा पदाने येत नाही. ते तुमच्या कृतीतून येते. काहीवेळा, जरी संघाचा तुमच्यावर विश्वास असला तरीही, तुम्ही खरोखरच पहिले व्यक्ती असता ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो, असेही धोनी म्हणाला.
MS Dhoni: धोनीने सांगितला पुढचा प्लान; निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात घालवणार वेळ
कर्णदार म्हणून यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे ड्रेसिंग रूममधील प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे. काही लोकांना दबाव आवडतो तर काही लोकांना दबाव आवडत नाही. एकदा तुम्ही हे केल्यावर, तुम्ही खेळाडूच्या कमकुवतपणावर काम करण्यास सुरुवात कराल, हे खेळाडूला आश्वासक बनवते आणि खेळाडूला स्वतःवर शंका घेण्यापासून प्रतिबंधित करते. ते कसे कार्य करते हे पाहणे त्यांना आवडते. कोणासाठी काय काम करत आहे हे शोधणे हे कर्णधार किंवा प्रशिक्षकाचे काम असते, असेही त्याने म्हटले आहे.