मांजरी : मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित ज्ञानेश्वर घुले यांनी आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्त्व समजून घेत मांजरी बुद्रुक आणि परिसरात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत कमी झाला आहे. तरीही, रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र सगळ्या ठिकाणी निर्माण झाली आहे.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. रक्ता अभावी कुणाचाही जीव जाऊ नये म्हणुन समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कटिबद्ध असणारे मांजरी बुद्रुक माजी उपसरपंच अमित आबा घुले यांनी ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. विविध सार्वजनिक संघटना आणि महिला मंडळ यांच्या पुढाकाराने उपसरपंच अमित ज्ञानेश्वर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरु केलेल्या ‘रक्ताचं नातं’ भव्य रक्तदान शिबीर आणि विविध उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मांजरी बुद्रुक चा समावेश महानगरपालिकेत झाला आहे. तरीही, ग्रामपंचायतमधून महानगरपालिकेत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांचा अद्याप पगार झाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्यांचा अद्याप पगार झाला नाही अशा कर्मचाऱ्यांना एक महिना घर चालविण्यासाठी किराणा साहित्याचे वाटप आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलांच्या अन्नदानासाठी किरणा साहित्याची भेट देण्यात आली आहे.
यासाठी शिवसाई महिला नवरात्र महोत्सव कमिटी आणि अमित आबा घुले युवा मंच आणि मित्र परिवाराने पुढाकार घेतला. यावेळी मांजरी बुद्रुक माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, भाजपा विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, शहर संघटक गणेश घुले, दादा कोद्रे, धाडसी बापू गायकवाड, संतोष पाखरे यांच्यासह मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि भाजपा आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह जवळपास चार ते पाच हजार नागरिकांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देत केक कापत शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शैलेश बेल्हेकर यांनी केले.