बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आपल्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सुहानाची सोशलवर फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.
सुहानाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने सुहानाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमधला तिचा अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.तिच्या हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
सुहाना खानचा हा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा तिच्या फॅन्समध्ये होताना दिसते.
अनेक चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तिला लाखोंच्या संख्येने लाइकस् केले जात आहे. दुसरीकडे चाहत्यांना ती चित्रपटसृष्टीत कधी पाउल ठेवणार याचीही उत्सुकता लागलेली आहे.