हडपसर – टेनिसपटू राधिका महाजन हिला पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी राधिकाला टेनिस प्रशिक्षणासाठी सुमारे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गेली पंधरावड्यात माजी नगरसेवक भानगिरे यांनी राधिकाच्या वडिलांच्यासोबत चर्चा करून ही मदत जाहीर केली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा हा पाच लाख रुपयांचा धनादेश राधिकाला लवकरच देण्यात येणार आहे. अशी माहिती माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दैनिक प्रभात ला दिली आहे.
यापूर्वीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच नाना भानगिरे यांनी मदत केली आहे. महापालिकेनेही राधिकाला काही मदत करता येईल का ते पहावे, असेही नाना भानगिरे यांनी सुचवले आहे.