परंडा (प्रतिनिधी): देशासह राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामध्ये रक्ताचा तुटवडा भासत होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत, परंडा शहरातील नगर परिषदेमध्ये कार्यालय निर्जंतुकीकरण करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते डॉक्टर व परंडा शहरातील पत्रकार बांधवांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
राहुल मोटे व सौ वैशाली मोठे यांनी सहकुटुंब सकाळी 9 वाजता रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ सुरूत केली. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 208 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास मास्क, सॅनिटायझर, टिफिन डब्बा वाटप करण्यात आला.
परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर आणि तालुका अध्यक्ष संदीप पाटील, सुभाष वेताळ, नवनाथ जगताप, धनंजय मोरे, धनंजय पाटील, धनंजय हांडे, वाजीद दखनी, नगरसेवक सर्फराज कुरेशी, संजय घाडगे, राहुल बनसोडे , बब्बू जिनेरी , सलमान शेख राजकुमार माने , बच्चन गायकवाड , मनोज कोळगे, शफीक पठाण धनु जाधव आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.